धुंद एका सांजवेळी… मराठी कविता संग्रह
₹257.00
- By: Dr. Chandrakant Bhoyar
- ISBN: 9789370023154
- Price: 257/-
- Page: 112
- Size: 6×9
- Category: POETRY / General
- Language: Marathi
- Delivery Time: 07-09 Days
Description
About The Book
‘धुंद एका सांजवेळी…’ हा डॉ. चंद्रकांत भोयर यांच्या काव्य प्रवासातील 72 मराठी कवितांचा काव्य संग्रह असुन त्यामध्ये प्रेम, श्रुंगार, निसर्ग, विद्रोह, वीरांचे स्तवन, मानवी संवेदना, अध्यात्म, तत्वज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणा-या कवितांचा समावेश आहे. तत्वज्ञान हा त्यांच्या कवितेचा स्थायी भाव असुन तो ब-याच कवितांमधुन प्रकर्षाने झळकतो. या काव्यसंग्रहामध्ये मानवी संवेदनांच्या मराठी भावकविता, भावगीत, गझल, अभंग, पोवाडा (स्वराज्य स्तवन) हे काव्य प्रकार समाविष्ठ आहेत.
‘पथिक’ असे मी भाव विश्वातला दुजा कुणी नाही;
संवेदना काहीच इथल्या मांडल्या केवळ ओळीने !
About The Author
डॉ. चंद्रकांत प्रभाकर भोयर, हे ‘भूजलशास्त्र’ या विषयात उच्च विद्या पारंगत असून सध्या ते ‘भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा’ या महाराष्ट्र शासनाच्या विभागात ‘उप संचालक’ या पदावर कार्यरत आहे. लेखन हा त्यांच्या आवडीचा विषय असुन त्यांनी वृत्तपत्रे व मासिके यामधून भूजल विषयक लिखाण केलेले आहे. ‘महाराष्ट्राची भूजलगाथा’ या पुस्तकाचे ते लेखक असुन त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मासिकांमध्ये ‘भूजल’ या विषयामध्ये शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना साहित्याची आवड असुन काव्य वाचन व लेखन हा त्यांचा छंद आहे. आजवर त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेत ब-याच कवितांचे लिखाण केलेले आहे.






Sagar Desai (verified owner) –
“धुंद एका सांजवेळी” हा कवितासंग्रह म्हणजे माणसाच्या अंतर्मनातल्या सूक्ष्म भावछटा, आठवणी, प्रेम, विरह, निसर्ग आणि जीवनदर्शन यांचा हळुवार काव्यसंवाद आहे. डॉ. चंद्रकांत भोयर यांच्या कवितांमध्ये शब्दांचा थाट नसून भावनांची सच्ची ओल आहे. त्यामुळे वाचकाला कविता वाचताना स्वतःच्याच आयुष्यातील एखादा क्षण पुन्हा जगल्यासारखा अनुभव येतो.
या संग्रहातील कविता प्रामुख्याने संध्याकाळी मनावर येणाऱ्या हळव्या भावना, आठवणींची धुंदी आणि जीवनाच्या संधिस्थळावर उभा असलेला संवेदनशील मनुष्य याचे प्रतिबिंब दाखवतात. “सांज” ही केवळ वेळ न राहता ती एक प्रतीक बनते—आयुष्याच्या, नात्यांच्या आणि अनुभूतींच्या मधल्या अवस्थेचे.
कवीची भाषा साधी, प्रवाही आणि अत्यंत परिणामकारक आहे. अलंकारिकतेपेक्षा आशयाला प्राधान्य देणारी ही कविता मनाला भिडते. प्रेमकवितांमध्ये नाजूक स्पर्श आहे, तर जीवनविषयक कवितांमध्ये प्रगल्भ चिंतन दिसून येते. निसर्गवर्णनातही भावनिक सूक्ष्मता जाणवते.
हा कवितासंग्रह वाचकाला केवळ कविता वाचायला लावत नाही, तर थांबवून विचार करायला भाग पाडतो. आजच्या धावपळीच्या जीवनात क्षणभर थांबून स्वतःकडे पाहायला लावणारी ही कविता आहे.
एकूणच, “धुंद एका सांजवेळी” हा कवितासंग्रह मराठी कवितेतील भावस्पर्शी, अंतर्मुख करणारा आणि मनात दीर्घकाळ रेंगाळणारा असा महत्त्वपूर्ण साहित्यिक अनुभव देतो.
ramesh.sankpal77@gmail.com (verified owner) –
“धुंद एका सांजवेळी…” हा डॉ. चंद्रकांत भोयर यांच्या काव्य प्रवासातील एक महत्त्वपूर्ण आणि भावसमृद्ध काव्यसंग्रह आहे. ७२ मराठी कवितांचा समावेश असलेला हा संग्रह वाचकाला प्रेम, शृंगार, निसर्ग, विद्रोह, वीरांचे स्तवन, मानवी संवेदना, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान अशा विविध भावविश्वांतून सफर घडवतो.
या काव्यसंग्रहाचा स्थायी भाव तत्त्वज्ञान असून तो अनेक कवितांतून प्रभावीपणे व्यक्त होतो. जीवनाकडे पाहण्याची कवीची चिंतनशील, प्रगल्भ आणि संवेदनशील दृष्टी वाचकाला अंतर्मुख करते. कविता वाचताना केवळ शब्द नाही, तर त्यामागील अनुभूती वाचकाच्या मनात उतरते. या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काव्यप्रकारांची वैविध्यता. भावकविता, भावगीत, गझल, अभंग तसेच पोवाडा (स्वराज्य स्तवन) अशा विविध काव्यप्रकारांतून कवीने आपली काव्यप्रतिभा समर्थपणे व्यक्त केली आहे. प्रत्येक प्रकारात आशयाची खोली आणि भावनांची प्रामाणिकता जाणवते. कवी स्वतःला ‘पथिक’ मानत भावविश्वात संचार करतो आणि आपल्या संवेदनांचा साधा, पण परिणामकारक आविष्कार शब्दांतून घडवतो. त्यामुळे अनेक कविता वाचकाला स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांची आठवण करून देतात.
“धुंद एका सांजवेळी…” हा काव्यसंग्रह केवळ वाचनापुरता मर्यादित न राहता, अनुभव घेण्यासारखा आहे. शांत संध्याकाळी, एकांतात वाचताना हा संग्रह मनाला स्पर्श करून जातो. मराठी काव्यप्रेमी व संवेदनशील वाचकांसाठी हा संग्रह नक्कीच वाचनीय आणि संग्रहणीय आहे
Mukesh Makde –
जीवन जगत असताना मनुष्य भुतकाळ किंवा भविष्य काळात अडकून पडतो व आयुष्यभर दुःख व दुःखाचीच अनुभूती घेत असतो. त्यातून मुक्तीचा मार्ग “धुंद एका सांजवेळी…” या काव्यसंग्रहातून मिळतो हे स्पष्ट दिसून येते. खूप खूप धन्यवाद त्या लेखकाला ज्यांनी वर्तमानात राहून प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल याबाबत खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर 🙏
meghawihg@gmail.com (verified owner) –
डॉ. चंद्रकांत भोयर सर यांच्या कविता वाचताना मला स्वतःच्या गावातील सांजवेळ आठवली. निसर्गातील बदल आणि मानवी मनातील भावना यांचा जो मेळ कवीने घातला आहे, तो वाखाणण्याजोगा आहे. आधुनिक जीवनातील ताणतणाव विसरायला लावणारी ही कविता आहे. लिखाण खूप सुंदर आहे.