जोडी तुझी माझी: एका लग्नाचा प्रवास | Jodi Tuzi Mazi: eka lagnacha prawas
₹399.00
- By: प्रज्ञा नारखेडे | Pradnya Narkhede
- ISBN: 9788116105147
- Price: 399/-
- Page: 257
- Size: 5×8
- Category: FICTION / General
- Language: Marathi
- Delivery Time: 07-09 Days
Description
About The Book
लग्न म्हणजे फक्त दोन जीवांची गाठ नसते, तर विश्वासाची परीक्षाही असते.
साखरपुड्यानंतरच्या सोनेरी दिवसांत गौरवीने विवेकसोबत संसाराची स्वप्ने रंगवली होती. पण एका रात्री तिच्या डोळ्यांसमोर जे आले, त्याने तिचा विश्वास हादरला. विवेकने गोड शब्दांत तिची समजूत घातली आणि तिने पुन्हा त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला.
पण लग्नानंतर परदेशात सुरू झाला एक वेगळाच प्रवास. एकटेपणा, दुरावा आणि न बोललेले प्रश्न. सगळ्यांसाठी समजूतदार राहणारी गौरवी स्वतःचे दुःख मात्र मनातच दडवत राहिली.
सत्य जेव्हा समोर येते, तेव्हा नाते टिकते की तुटते?
आणि चूक कळल्यानंतर मिळालेली दुसरी संधी खरंच पुरेशी असते का?
जोडी तुझी माझी. नात्यांतील विश्वास, क्षमा आणि प्रेमाची हळवी कहाणी.
About The Author
प्रज्ञा नारखेडे या पुण्यात राहणाऱ्या असून अभियांत्रिकी महाविद्यालयात सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनाच्या बरोबरीनेच लेखन हा त्यांचा आवडता छंद आहे. त्या कविताही लिहितात आणि त्यांचे लेखन त्यांच्या ब्लॉगवर तसेच प्रतिलिपी या ऑनलाइन व्यासपीठावर वाचकांपर्यंत पोहोचते. वैवाहिक नात्यांतील भावबंध उलगडणारी ही त्यांची पहिलीच कादंबरी आहे.






Reviews
There are no reviews yet.