About the Book
पोलिस अधिकारी असलेल्या वडिलांची बदली झाल्यानंतर, नऊ वर्षाच्या मिनीचे आयुष्य बदलून जाते. अहमदनगरमधली तिची शाळा आणि शाळासोबती मागे सोडून आलेली, दुःखी मिनी, आई-बाबांबरोबर, सुंदर समुद्रकिनारा असलेल्या डहाणू या गावात राहायला येते. पण ते सगळे डहाणूला पोचण्याआधीच खळबळ सुरू होते. एक पांढरी एसयूव्ही गाडी त्यांच्या जीपला जवळपास धडकच देऊन, वेगाने निघून जाते. क्रिश आणि रिचा, ही जवळच राहणारी जुळी भावंडे, मिनीचे डहाणूमधले नवीन मित्र होतात. शांत, छोट्या डहाणूत, एकापाठोपाठ एक, विचित्र प्रसंग घडायला लागतात. डहाणू किल्ल्यात काही लोकांचे संशयास्पद बोलणे मुलांच्या कानावर पडते. पांढऱ्या एसयूव्हीचा शोध सुरू असताना, आणखी काही विचित्र घटना घडतात. अपरात्री मोटरसायकलवरून मोठा आवाज करत काही लोक फिरायला लागतात, पहाटे चोऱ्या होतात, आणि जंगलातून तर चक्क लांडग्याच्या ओरडण्याचा आवाज यायला लागतो! या सर्व घटनांचा एकमेकांशी संबंध आहे, असे मुलांना वाटत असते, पण मोठ्या लोकांना त्यांना हे पटवून देणे अवघड जाते. अखेर, त्यांची अंत:प्रेरणा आणि हुशारी वापरून, मुले हे रहस्य सोडवतातच.
About the Author
मीनल दिघे मुंबईत राहतात आणि “पुस्तकी किडे असलेल्या दोन मुलींची पुस्तकवेडी आई” असे स्वत:चे वर्णन करतात. इतर विषयांबरोबरच त्यांनी केमिकल इंजिनियरिंग, मानवी संसाधनाचे व्यवस्थापन, मानसशास्त्रीय समुपदेशन यांचा अभ्यास केलेला आहे. आदिवासी भागातल्या पालिकेच्या शाळांना त्या मदत करतात. भारतात आणि जगभर त्या प्रवास करतात आणि जिथे जातील, तिथे “गोष्टींच्या शोधात” असतात. फावल्या वेळात त्या एका ग्रंथालयाला मदत करतात, मुलांना स्पॅनिश भाषा शिकवतात आणि ब्लॉग लेखन करतात. लहानपणी त्यांचे वास्तव्य डहाणूत होते. त्यांचे वडील भारतीय वन विभागात नोकरीला होते, त्यामुळे त्या महाराष्ट्रातल्या अनेक जंगलांमध्येही राहिलेल्या आहेत. त्यांनी लिहिलेले हे पहिले पुस्तक आहे, त्यात त्यांनी त्यांच्या बालपणीच्या जादुई दिवसांना उजाळा दिलेला आहे. निसर्गावर असलेले त्यांचे प्रेम त्यांच्या लेखनातून व्यक्त होताना दिसते.
Reviews
There are no reviews yet.